Previous इष्टलिंग-चरलिंग -स्थावरलिंग सामाधी लिंगपूजा Next

सर्वांग लिंगत्व

✍ पूज्य श्रीमन् निरंजन महा जगदगुरु लिंगानंद स्वामीजी
आणि महा जगद्गुरु डा. माते महादेवि

*

सर्वांग लिंगत्व

सर्वांग शुद्धीचे पुढची पायरीच सर्वांग लिंगत्व, म्हणजे सर्व इंद्रिय दैवीमय व्हावे. पंचज्ञानेद्रिय, पंच कर्मेंद्रिय पंच प्राण, अंत:करण सर्वातच देव भरला पाहीजे.

माझ्या नव-याची तन्हा काय सांगू बाई
अंग विद्या नको त्याला
डोळ्यातील कचरा कढल्या विणा
तो पहात नाही आम्हा
हात धुतल्याशिवाय शिवू देत नाही
पाय धुतल्याशिवाय चालत नाही
असे सर्वांग शीर धुतल्या कारणे
कूडलसंगमदेव माझ्यात सामावला आहे. --श्री बसवेश्वर २११

परमात्मा रूपी पतीला विनविण्साठी शरण सती अत्यंत परिशुध्द पतिव्रता असणे आवश्यक आहे. कारण तो निरंजन स्वरूप आहे. प्राकृतीक गुण जिंकल्या शिवाय तो प्रसन्न होत नाही. वाईट दृष्टी घालवून डोळे शुध्द झाले पाहीजेत अनिष्ठ कार्य न करता हात स्वच्छ झाले पाहीजेत. वाईट वागणे नसून पाय पवित्र झाले पाहिजेत. असे सर्वांग लिंगत्व साधणे हेच लिंगांग योगाचे अंतिम ध्येय आहे. याच्यात तीन प्रकार आहेत. पहिला त्यागांग, भोगांग, योगांग. पदार्थ त्याग, प्रसाद भोग, लिंग योग हे तीन प्रकार आहेत. दिव्य जीवनाला आड येणा-या पदार्थाचा आधी त्याग करावा. शेतात तण पालवी गाशा असताना कोणतीही बीज पेरल्यास व्यर्थ. तसेच प्रकृतीक गुणाने भरलेल्या देह क्षेत्रात दिव्यज्ञानाचे बीज पेरणे सुध्दा व्यर्थच.

इकडे तिकडे जाऊ नये म्हणून पांगुळा कर बाप्पा
फिरून फिरून न बघण्यासारखा आंधळा कर बाप्पा
आणखी काही ऐकू नये असा बहिरा कर बाप्पा
तुमच्या शरणांच्या पाया शिवाय अन्य विषयाकडे
न वळण्यासारखे मला ठेवा कूडलसंगमदेवा --श्री बसवेश्वर ५९

देवासी संबंध नसणारा कोणताही विषय ऐकणे, पहाणे व बोलणे साधकाच्या मनाला आवडत नाही. हीच पदार्थ त्यागाची स्थिती. ही मानवाला शुध्द करण्याची साधना. याप्रमाणे शुध्दी करण करून रिकामी पडलेली जागा. दिव्य स्मरणाने भरावी. पदार्थ सोडलेल्याने आता प्रसाद स्विकारावा

वचनामध्ये नामामृत भरूनी
नयनी तुमची मूर्ती भरूनी
कानी तुमची किर्ती भरूनी
मनामध्ये तुमची स्मृती भरूनी
हे घनलिंग देवा तुमच्या
चरण कमली मी सामावुनी --श्री बसवेश्वर ४९१

वाईट बोलू नये म्हणूप मुकी बनवलेल्या जिव्हेवर नामामृत भरावे. वाईट काही बघू नये म्हणून आंधळे बनवलेल्या डोळ्यांना आता देवाचे साकार स्वरूप पाहण्यास लावावे. देवाशी संबंध नसलेल्या गोष्टी ऐकू नये म्हणून बहिरे केलेल्या कानांना देवाची किर्ती ऐकण्यास लावावे. अन्य काही चिंतन करू नये म्हणून बंदिस्त केलेल्या मनाला आता देवाच्या स्मरणात. आनंदण्यास सोडावे. असे सर्वांगात देव व्यापल्यावर जीवनच एक योग.

लिंग योग

माणिक गिळलेल्या माशाप्रमाणे लिंगाचा प्रकाश अंगिकारलेल्या शरणांचे जीवनच एक अखंड योग, तेव्हां तो सर्व स्थिती ओलांडून थांबतो.

डोळे भरल्यावर पाहीलो नाही.
कान भरल्यावर एकलो नाही.
हात भरल्यावर पूजलो नाही
मन भरल्यावर स्मरलो नाही
महंत कूडलसंगमदेवाला --श्री गुरूबसवेश्वर ८५२

पूजा भाव असे पर्यंत लिंग देवाला गाईलो
क्रियाभाव असे पर्यंत जंगमाला गाईलो
जिव्हा भाव असे पर्यंत प्रसादाला गाईलो
हे त्रिविध मिटल्यावर
मला मीच गाऊन घेतलो, कूडलसंगमदेवा --श्री गुरूबसवेश्वर ९०६

शरण जगल्यास ती शिवरात्र, झोपल्यास तेच जप, शरण चाललेली भूमी पावन ते बोलल्यास परतत्व त्यांचे अस्तित्व चैतन्य समाधी त्यांचे जीवनच लिंगयोग त्यांची कायाच कैलास. (ब.ष.व. ९१६)

शरण आपल्या देहरूपी मडक्यात चैतन्य ज्ञान रूपी द्रव पदार्थ भरून चित्त समता रूपी पाणी घालून पवित्र झालेले इंद्रीय रूपी झाकण ठेवून ज्ञान रूपी जाळ लावतात. मतीरूपी पातेल्यात शिजवूण दिव्य जीवन रूपी प्रसाद तयार करतात. आपल्या भावरूपी आसणावर देवाला बसवून परिणाम संतृप्तीरूपी प्रसाद त्याला अर्पण करतो असे लिंग योगींचे समग्र जीवनच परमात्म्याला अपत त्याचे अस्तित्वच पूजा, गोष्टीच प्रर्थना.

Reference: "Ivalasa Jhala Paramatma" -A prose written by Maha Jagadguru Lingananda Swamiji & Maha Jagadguru Mate Mahadevi.
Published by Suyidhana Sugrantha Maale, Vishwakalyan Mission, Basava Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block Bangalore - 560 010
अनुवाद: शरण श्री गुलाब हसन नदाफ.

*
सूचीत परत
Previous इष्टलिंग-चरलिंग -स्थावरलिंग सामाधी लिंगपूजा Next
cheap jordans|wholesale air max|wholesale jordans|wholesale jewelry|wholesale jerseys