Previous अष्टावरण सदाचार Next

लींगाचार

*

लिंगाचार म्हणजे आपल्या इष्टलिंगाशिवाय दुस-या लिंगास न जाणणे होय. शुध्द कायक करून गुरू, लिंग, जंगमाना देणे हा सदाचार. शिवभक्तात कुलगोत्र, जात, वर्णाश्रम न पाहता त्यांना स्वीकार करणे हा शिवाचार, शिवाचाराची निंदा न ऐकणे हा गणाचार शिवशरण श्रेष्ठ असून आपण कनिष्ट समजून भय भक्तीचे आचरण ठेवणे हाच भृत्याचार. अशा पंचाचाराचे आचरण करणा-या भक्तांनी दिलेले, मज देऊन रक्षण करावे प्रभु. कूडल चन्नसंगमदेवा (चन्नबसवेशांचे वचन ११९०)

(अ) सृष्टीचा कर्ता करूणामय असा परमात्मा आहे. अशी अचलश्रद्धा ठेऊन, त्यास मानवाच्या आकारात, ऐतिहासिक व्यक्तीच्या रूपात पूजा करू नये. हे जाणून मूर्तीपूजा, स्थावर लिंगपूजा इत्यादि वैदिक शैवाचरण सोडून परमात्म्याला विश्वाच्या आकारात, इष्टलिंगाच्या रूपातच पूजा करण्याची एकदेवोपासकच लिंगाचार म्हणजे देव हा एकच आहे. अशी श्रद्धा ठेऊन एकच आकारान पूजा करणे होय.

(आ) सत्-चित्-आनंद रूपी देव ही मार्गदर्शन करण्यासाठी आत्मदर्शन देण्यासाठी, मंत्रपुरूष मुक्तीदायक बसवेश्वर गुरू होउन, आलेल्या बसवण्णानी रिराकार अमलेल्या देवाला जाणावे म्हणून विश्वाच्या आकारात इष्टलिग दिले. असे परमात्मा पूजा स्वीकारून, सदैव शरणागत लोकांचे रक्षण करण्यासाठी लिंग होऊन, चैतन्यरूप होऊन, उद्धार करण्याकरिता जंगम होऊन अवतराला म्हणून इष्टलिंग आणि चैतन्यरूप असलेल्या गुरु बसवेशाशिवाय कोणाचाही पूजा करू नये. गरोदर स्त्रीने घेतलेला आहार गर्भस्थ शिशुस पोहोचतो; त्याप्रमाणे महागर्भ असलेला इष्टलिंगपुजा केल्यास त्यात म्हणजे विश्वात असलेल्या सर्व महात्म्यांची पूजा सहजपणे घडते.

(इ) मूर्तीपूजा, बहुदेवोपासना यास प्रोत्साहन देण्यास लाखो रूपये खर्च करून देवालय न बांधता, जीवंत देवालय असणा-या धर्मवंताना, धर्मनिष्टजनांना निर्माण करणा-या बसवमंटपाचे निर्माण करून त्यांत सतत अध्यात्मिक बोध देण्यास प्रोत्साहन देणारा तोच लिंगायत.

लिगायत धर्मशास्त्राप्रमाणे अन्न देवता, देवालय, निर्माण स्थावर लिंग प्रतिष्ठापना हे तत्व विरोधी आचरण आहेत. प्रभुदेव म्हणतात,

"दगडाचे घर करून, दगडाचेच देव बनूवून,
त्या दगडावर दुसरे दगड ठेवलास देव कोठे गेला?
लिंग प्रतिष्ठापना करणा-यास घोर नरक असे गुहेश्वरा"
(अल्लम वचन चंद्रिका)

“स्थावर हा नाशवंत आहे, जंगम हा अविनाशी आहे या त्याप्रमाणे शरणांनी देवालय पद्धत, पुजारी पद्धत या दोन्हींचा विरोध केला. जंगमात्मक असलेला, ज्ञानप्रसार करणा-या, लोकांना परिवर्तन करणा-या यांचे निर्माण केले. धर्मसंस्काराने धर्मात आलेल्या सर्वानी एकजुटीने एकमताने तत्वाचे समालोचन करावे. आपला आचार-विचार परिपूर्ण स्थितीला जावे असे वाटत असल्यास अध्यात्मिक सत्संगात राहवे, असले सत्संग (Holy Communion) देणारे मंटप नर्माण व्हावे.

सत्संगाची महिमा सांगताना चन्नबसवेश म्हणतात

"केस मळकेल्यास डोक्यावरुन नहावे
कपडे मळकेल्यास धोब्यास द्यावें
मनातील मळ धुण्यास कूडल चन्नसंगय्यांच्या
शरणाशी अनुभव (सत्संग) करावे (च. ब.व. १०९)

“सद्भक्तांचे संग मज द्यावे
कूडल संगम देवा हाच तुमचा धर्म" (ब.व. ८८१)

असे बसवेश्वरांनी म्हटले आहे.

(ई) एक देवोपासक असलेला लिंगायताने आपल्या इष्टलिंगाशिवाय दूसरे काहीही धारण करू नये, पूजा करू नये. काही लोक घराण्याचे देव, कुलदेव म्हणून वेगवेगळ्या देवदेवतांची पूजा अर्चाना करतात. लिंगायतास घरचा देव, कुलदेव नाही.

वीरभद्र, नंदी, मल्लिकार्जुन देवास आपले कुलदैव म्हणणान्यास गुरू नाही, लिंग नाही, जंगम नाही, पादोदक प्रसाद नाही. कुडल चन्न संगम देवा (च.ब.व. २२६)

(उ) काही लोक परशिवाचे पंच मुख करून स्थावर लिंगावर, इष्टलिंगावर ठेवून पूजा करतात. इष्टलिंगास कोणत्याही प्रकारच्या मूर्तीत्वाची कल्पना करणे चुकीचे आहे. याविषयी चन्न बसवेशाचे वचन आहे. (९२६)

ऊ) शकुन अपशकुनावर विश्वास न ठेवता वाईट घटिका, दुष्ट घटिका, चांगली घटिका, उत्तम घटिका असे संशय मनात आणू नये. कुंभाभिषेक, रूद्राभिषेक इत्यादि स्थावर क्रिया न करता दूध, तूप, मध इत्यादि देवावर पंचामृत, नवामृताचा अभिषेक देवावर करून पाण्यात वाहू देऊ नये. आपण राहिलेले देवालय, इष्टलिंग हे सर्वस्व, सारे विश्वच परमात्म्याचे महाआलय होय, आपण त्या देवास काय अर्पण करायचे हे मुख्य आहे. म्हणून एक इष्टलिंगातच निष्ठा ठेऊन आत्मविश्वासाने जगणारा लिंगाचारीच खरा लिंगायत होय.

शेकडो संप्रदाय, मूढपणाच्या प्रभावाला बळी पडलेल्या आजचा समाज धीरपणाने स्वतंत्र विचार करून शरणांचा संदेश, उपदेशा प्रमाणे वागण्याचा आत्मविश्वास केंव्हा प्राप्त करून घेईल हे सांगता येणार नाही. विवाह वगैरे कार्य करतानासुध्दा ज्योतिष्य, पंचांग, मुहूर्त पाहण्याची जरूरी नाही, असे शरणांचे मत आहे. याविषयी चन्नबसवेश्वरांचे मत आहे (च.ब.व. ११३)

शरण झालेल्यांना लग्न, विघ्न, नवग्रहांचा त्रास कोणतेही नाही असा आत्मविश्वासाने वागणाराच लिंगायत.

लिंगायताने यज्ञ-याग, होम-हवन, देवाच्या नावावर प्राणीवध, दूध, तूप, तीळ इत्यादि आप्यायन प्रसाद अग्नीत घालणे अथवा पंचामृताने देवाला अभिषेक घालून पाण्याबरोबर सांडणे इ. करू नये. आपले इष्टलिंगाशिवाय आपल्याहून भिन्न असा स्थावर लिंगाला रूद्राभिषेक, दीपाराधना, रूद्रपठण इत्यादि शैव आणि वैदिक पध्दतीचे कार्य करू नये. पौराणिक देवाला म्हणविणा-या विघ्नेश्वर, सरस्वती, लक्ष्मी इ. बाहेर ठेऊन पूजा करू नये. कारण ब्रम्हांडाचा मालक परमात्माच सर्व विघ्ने दूर करणारा, विद्या देणारा, संपत्ती देणारा ही सर्व शक्ती त्याच्यात सामावलेली आहेत. नवग्रह पूजा, नवग्रह स्थापना, शनी महात्म्य पठण वगैरे करू नये. काही झाले तरी आपले सर्व सुख दु:ख ‘मागितलेले देणा-या इष्टलिंगालाच निवेदन करावे' सोड्डळ बाचरस आपल्या वचनातुन म्हणतात

गंगानदीत स्नान केल्यानंतर घाण पाण्यात लोळावे का ?
चंदन असता दुर्गंध अंगाला लावावे का ?
घरी गाईचे दूध असता कुत्र्याचे दूध पहावे का ?
हवे असलेले अमृत जवळ असता अंबिल मागून खाणाच्या
भ्रमित मानवा तू ऐक रे.....
(सोडूडळ बाचरस पान नं. २३४) शरणचरितामृत.

श्रेष्ठ तत्वाने परिपूर्ण असणा-या इष्टलिंगाची पूजा करून परत अशा सामान्य देव-दैवतांची पूजा केल्यास गंगानदीत स्नान करून घाण पाण्यात लोळण्याप्रमाणे असे शरणांचे मत आहे. म्हणून लिंगायताने तिरूपती इत्यादि क्षेत्राला जाऊन केस काढून मुद्रा लावून घेणे, ताईत चिट्ठी बांधून घेणे चुकीचे आहे.

लिंगायताच्या घरातील पूजागृहात कोणतेही मूर्ती, विग्रह, स्थावर लिंग असू नये. आपण पूजेला बसण्याची खोली शांत असावी, ही दिशा ती दिशा म्हणून विशिष्ट दिशेकडे पूजेस बसण्याची पध्दतही चुकीची, सर्व दिशेत परमात्मा असतोच. आपल्या शरीरावरील इष्टलिंगाचीच पूजा करावी. अनुसंधान करावे. पण आज लिंगायताच्या घरातील पूजेची खोली पाहिल्यास तेथे विविध देवतांचे भावचित्र व मूर्तीचे एक संग्रहालय असल्यासारखे दिसते. हात ठेवायला जागा नसल्याचे पाहून बसवेश्वर वदले,

"लाखाने भरलेल्या, वितळल्यास विरघळणा-या देवाला
विस्तवाचे झळ लागता गोळे होणा-या देवाला
अडचण आल्यास विकणा-या देवाला
भितीपोटी पुरवून घेणा-या देवाला काय म्हणावे
सहजभाव निजैक्य कूडल संगम देव हा
एकटाच देव खरा' (ब. ष. व. ५५६)

आपणच निर्माण केलेल्ये अशा देवतांना ठेऊन पूजा करू नये, तर आपल्याला निर्माण केलेल्या देवालाच पूजावे.

लिंगायत हा मंगलमय असलेल्या देवाला सदैव आपल्या देहावर धारण केल्यामुळे त्याची कायाच कैलास म्हणून तो जनन सूतक, मरण सूतक, जाती सूतक, रजस्सूतक, उच्छीष्ट सूतक अशी ही पाचही सूतके पाळू नयेत, असे चन्नबसवण्णांनी आपल्या वचनात म्हटले आहे.

गुरू कृपा कटाक्षाने उत्पन्न झालेल्या अजतास
जातीसूतक, जनन सूतक, प्रेतसूतक
रजस्सूतक, उच्चिष्ट सूतक नाही
सूतक पाळणा-यांना गुरू नाही, लिंग नाही
जंगम नाही, प्रसाद नाही कूडल चन्नसंगम देवा
(च.ब.व. १३०)

स्त्री प्रसूत होताना लिंग ओवळे होईल म्हणून तिच्या शरीरावरून काढणे, सूतक म्हणून तिला न शिवणे, हे सर्व चुकीचे आचरण होय. सूर्याला अंधार मारू शकणार नाही. सूर्य नसताना मात्र अंधाराचेच राज्य होईल. याप्रमाणे लिंग हे केंव्हाही अपवित्र होणार नाही. खालच्या जातीतील लोकांना शिवल्यावर आपण अपवित्र झालो म्हणून समजणे दलितांना अन्न पाणी न देणे इ. जातीसूचक पाळणे. स्त्री बाहेर बसल्यावेळी लिंगाय्तांनी तिला बाहेर न बसविता आपल्यात मिसळावे. गुरूप्रसाद स्वीकारताना उष्टे म्हणणे चुकीचे आहे. हे सर्व सूतक लिंगायताला शिवणार नाहीत.

लिंगायत धर्माचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे धार्मिक स्वातंत्र्य आणि पूजा स्वातंत्र्य होय. देवाची पूजा आपण स्वत: करू शकतो. कुणा पुजा-याचे बंधन न पाळता पूजा करण्याचे स्वातंत्र्य सर्वांना आहे. चार भिंतीचे देऊळ बांधून त्यात एक मूर्ती ठेऊन काहींना देवळात घेऊन, काहींना बाहेर ढकलून, तसेच घुसल्यास त्यांना पूजेचे स्वातंत्र्य न देता (कांही देवळात असे घडते) लांबून, वरून तीर्थप्रसाद देण्यात समानता नसल्याचे जाणून बसवदेवांनी आपापल्या शरीरावर देवधारणा करून पूजा करण्याची संधी मिळवून दिली. आपल्या वतीने पुजा-याने पूजा करण्याचा मूढ विश्वास सोडावयास हवा. याविषयी बसवेश म्हणतात -

आपले भोजन आपणच घ्यावे !
आपली रतिसुख आपणच भोगावे
लिंगार्चनादि नित्यनेम आपले आपणच करावे !
करविता येईल कां दुस-यांच्या करवी ?
हे न जाणता जे औपचारिक करिती
ते कैसे जाणतील तव कुडलसंगम नाथ ? !!
(ब.ष.व. १८३)

आपल्याला भूक लागल्यास आपणच जेवल्याप्रमाणे, आपली इच्छा झाल्यास आपल्या पत्नीबरोबर रतिसुख आपण भोगल्याप्रमाणे, आपल्या आत्म्याचा दाह मिटविण्यासाठी आपण स्वतः पूजा केली पाहिजे. ज्याप्रमाणे सती-पतिंच्या मन:पूर्वक संबंधात कोणाचीही मध्यस्थी लागत नाही त्याप्रमाणे देवभक्ताच्या मिलनात कोणत्याही पुजा-याच्या मध्यस्थीची जरूरी नसते. स्वहस्ते देवाची पूजा करून त्याने मिळणाच्या दैवीकृपेने भक्ताच्यात अपार आत्मविश्वास वाढतो. देवालय पध्दत आणि पुजारी पध्दत ही दोन्हीही बसवण्णा मानत नाहीत. सांप्रदायिक धर्मात स्त्री ही शुद्र आहे. तिने स्वतः देवपूजा करू नये. तिला तो हक्क नाही. पतीने पूजा करावी, त्याची सेवा हिने मन:पूर्वक केल्यास तिलाही मुक्ती मिळेल. ह्या विचाराचे बसवण्णांनी खंडन केले आहे. आत्मचैतन्य साधनात्मक देहधारण करणा-या प्रत्येकाला पूजा करण्याचा हक्क आहे. अध्यात्मातील मोक्ष मार्ग पार अरूंद आहे, त्यातून एकटाच जाऊ शकतो, एकाच्या साधनेच्या बळावर दुसन्याला जाता येत नाही. मग पतीची सेवा केल्याने पत्नीला पुण्यगति मिळते हे खरे आहे काय ? हे एका अर्थाने सत्य आहे. तिला पुण्यगती मिळेल पण मुक्ती अगर मोक्ष मिळणार नाही. पती परमेश्वर मानून सेवा करणे म्हणजे ही नीति. देवालाच पती मानणे हे अध्यात्म, नीतिने पुण्य-स्वर्ग लाभतो. अध्यात्माने मुक्ती-मोक्षाचा लाभ होतो म्हणून मोक्षाची अभिलाषा असणा-यांनी मन:पूर्वक, निष्ठेने पूजा करून भवपाश तोडून टाकावे.

Reference: Lingayat Dharma Darpan - A Prose composition written by Her Holiness Maha Jagadguru Dr. Mate Mahadevi, translated by Sharni Sou. Shashikala Rajshekhar Madki
Pub: Vishwakalyan Mission, Basav Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block, BANGALORE - 560010.]

सूचीत परत (index)
*
Previous अष्टावरण सदाचार Next