*
गुरू-लिंग-जंगम ही पूज्य असून विभूती, रूद्राक्ष, मंत्र या साधनेने पूजा केल्यास भवनाश होण्यास सहाय्यक साधन म्हणून आणि लाभलेले पूजेचे फळ म्हणजेच पादोदक-प्रसाद होय. विद्युत शक्ती पसरण्यास, वाहून येण्यास तार जसे माध्यम आहे त्याचप्रमाणे पादोदक-प्रसाद ही गुरूकृपा वाहून येण्याचे माध्यम आहेत. पाण्यात गुरूचा कृपारस मिळताच तेच पादोदक, होते. पदार्थात अनुग्रह शक्ती मिसळताच तो प्रसाद होतो. या जगातील उपयोगात आणल्या जाणा-या सर्व वस्तु देवाला अर्पण करणे म्हणजेच नैवेद्य. त्यात त्याचा करूणारस मिळाला आणि आपल्याला लाभला तर तो पमाद होतो.
पण अध्यात्मिक कल्पना नसलेल्या लिंगायत धर्मशास्त्र व्यवस्थितपणे अभ्यास न केलेले कांही मूढ लोक जंगम हा जातीवाचक समजुन. पादोदक प्रसादाचा स्विकार करतात याकरता महात्मा बसवेश आपल्या वचनातून म्हणतात.
क्रीयाचार नसलेल्या गुरूकडून, दीक्षा मंत्रोपदेश घेऊ नये
क्रीयाचार नसलेल्या शिलेला लिंग म्हणून पूजा करू नये
क्रीयाचार नसलेल्या जंगमाकडून पादोदक प्रसाद घेऊ नये
आचरण नसलेल्या अनाचर करणा-या दुराचारी कडून
दीक्षा, मंत्रोपदेश, पादोदक, प्रसाद घेतल्यास दु:खाचा नाश
न होता अघोर नरक नाही चुकणार पहा कुडलसंगमदेवा' (ब.व.११२३)
सदाचार, सत्क्रिया नसलेला तो कोणत्याही जातीचा असला तरी तो गुरू नव्हे. चित्कला नसलेले दुकानातून विकत आणलेले ते लिंग नव्हे. सद्वृती नसलेला तो जंगम नव्हे. केवळ जातीच्या आधारावर त्यांच्याकडून दीक्षा घेऊन पादोदक-प्रसादचा स्वीकार करू नये. तसे केल्यास पापाचा नाश न होता अधिकच पाप संचय होईल. देणात्याच्यांत ज्या शक्तीचा संचय असतो, तो दुष्ट असो वा तप:शक्ती असो करूणाप्रसाद घेणा-या साधकाकडे वाहून येतो. दुर्व्यसनी, दुर्गुणी असलेल्या व्यक्तीकडून पादोदक-प्रसाद स्वीकार केल्यास भले होण्याएवजी वाईटच अधिक प्रमाणात घडते. जन्मतः तो कोणत्याही जातीचा का असेना पण तो लिंगदीक्षा घेऊन, तप:शक्ती प्राप्त करून, सत्य सदाचारी असल्यास तोच जंगम होय. त्याच्याकडून लिंगायतांनी निस्संदेहपणे करूण प्रसाद घ्यावयास हरकत नाही.
सत्य सदाचारी असणारे, अध्यात्मिक शक्ती प्राप्त असलेले महात्मे या काळात लाभणे दुर्लभ आहे. विद्याभ्यासाठी, व्यवसायासाठी कांहीना परदेश प्रवास करावा लागतो. त्यावेळी त्यांना गुरू जंगम कुठे मिळतील? अशा वेळी संबंधाचरण करावे. प्रत्यक्षपणे गुरू-जंगमांची पादपूजा करून पादोदक-प्रसाद घेणे हे सहजाचरण, ते नसताना गुरूनी दिलेल्या इष्टलिंगावर पाचही बोटाने पाणी घालून स्वीकार करणे हे संबंधाचरण, योग्यता असलेल्या गुरू जंगम नसल्यावेळी संबंधाचरण करणेच इष्ट होय.
प्रसाद तत्वात घेतलेल्या (आप्यायन) प्रसादाची नासाडी करू नये. असे अत्युन्नत आचरण आहे. आपल्याला हवे तितकेच घ्यावे. जास्त घेऊन ताटात उष्टे टाकणे हे श्रीमंतपणाचे, मोठेपणाचे लक्षण समजावे हे शरणांना मान्य नाही. तसे केल्यास प्रसादास (अन्नास) द्रोह केल्याप्रमाणे होईल म्हणून खंडन केलेले आहे.
अन्न म्हणजे देवाचा प्रसाद. तो स्वीकार करणारी व्यक्ती आपल्या ताटात घेतलेले अन्न कोणत्याही कारणे ताटात तसेच ठेवणे अगर ताटातून बाहेर काढून ठेवणे हे प्रसादाचा अपमान केल्यासारखे आणि राष्ट्रीय नुकसानही होय. तसे करणारे माकडाच्या जातीचे म्हणून सर्वज्ञ. कवीने टीका केलेली आहे.
Reference: Lingayat Dharma Darpan - A Prose composition written by Her Holiness Maha Jagadguru Dr. Mate Mahadevi, translated by Sharni Sou. Shashikala Rajshekhar Madki
Pub: Vishwakalyan Mission, Basav Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block, BANGALORE - 560010.]
*