Previous इष्टलिंगाचे साकार रूप लिंगाग योगियांचे बहीरंग जीवन Next

साक्षात्कार

✍ पूज्य श्रीमन् निरंजन महा जगदगुरु लिंगानंद स्वामीजी
आणि महा जगद्गुरु डा. माते महादेवि

*

साक्षात्कार

या अनुभवात आणखी एका अनुभवाबाबत सांगीतलेच पाहीजे तोच साक्षात्कार साधकांच्या जिवनमार्गात आपण दोन प्रकारचे साक्षात्कार
ओळखू शकतो.

१. सगुण किंवा खंड साक्षात्कार
२. निर्गुण किंवा अखंड साक्षात्कार


म्हणजे, सगुण कोणत्याही एका आकारात(Audio visual from)पहाणे म्हणजे ती वस्तू डोळ्याला दिसते त्याच्या कानाला ऐकू येतात. ते प्रवाहीत झाल्यावर साधकावर अद्भूत परिणाम होतो. रोमांचीत होतो. परंतू त्याला स्पर्श करणे किंवा धरणे शक्य नाही.

चमकणा-या लाल रंगाच्या जटा मणी मुकुट
हसरा चेहरा डोळ्याचे तेज
चौदा भुवनी प्रकाशणाच्या दिव्य स्वरूपाला पाहीले मी
पाहून डोळ्याचे पारणे फिटले
सर्व पतीना पत्नी म्हणून वागवणा-याला पाहीले मी
जगताच्या शक्तीत सामावून बोलणारे
परमगुरु चन्नमल्लिकार्जुनांचे स्वरूप पाहून जगले मी --अक्का महादेवी ३३८

दुसरे म्हणजे अखंड किंवा निर्गुण साक्षात्कार, यात पुन्हा दोन प्रकार आहेत आत्म साक्षात्कार व परमात्मा साक्षातकार किंवा प्राणलिंग व भावसाक्षात्कार लिंगाग योगी आपल्यातील आत्मलिंगा प्रकाशाला आधी पहाता, त्यानंतर ब्रम्हांडात असलेला परमात्मा प्रकाशाला पहातो.

चक्रभेदन

सर्व योगात अत्यंत कष्ट साध्य म्हणजे प्रमुखपणे चक्रभेदन साधणारा कुंलिनी योग. बाकी सर्व योगापेक्षा याला श्रम सतत अभ्यास व साधना पाहीजे. हा एक प्रकाराचा सुक्ष्माती सुक्ष्म योग विज्ञान, परंतू याला लिंगाग योग अत्यंत सुलभपणे साधतो सर्वाला एकच साधन म्हणजे 'इष्टलिंग'.

उदाहरणार्थः चोरांची एक टोळी आहे. त्यातला एक चोर सापडल्यास त्याच्याद्वारे पोलीस उरलेल्या चोरांचा पत्ता शोधून काढतात. त्याचप्रमाणे चंचलपणे वहाणारी दृष्टी एक महान चोर, पळणारे पाय, पहाणारे डोळे, दोन्हीही सर्व पाप कार्याला कारणीभूत आहेत. डोळे पाहून शक्ती शाली आहेत. पाय न जाणाच्या ठिकाणीसुद्धा, जाण्याचे सामर्थ्य लिंगांग योग व अनुभाव डोळ्यात आहे. अशा दृष्टीरूपी नायकाच्या पाठी लागून उरलेली चोरांची टोळी सर्व पाप कार्यात मग्न होते. मन श्वास बुद्धी व कुंडलिनी शक्ती हे सर्व साथीदार. अशा दृष्टीरूपी चोराला 'इष्टलिंगरूपी' काळ्या कवच्याचे पोलीस धरून ठेवल्यास त्याच्या मागोमागच मन, प्राण, बुद्धी सर्वच लिंगबंधनात बंद होतात त्याला चामरसाच्या एका वचनात आपण पाहूया.

डोळ्याच्या बाहूल्या थांबल्यास वाहणारा
श्वास थांबेल खास थांबल्यास मन
वर थांबेल मन थांबल्यास बिंदू थांबेल
लिलेने बिंदू थांबल्यस
कालकर्म जिंकून माया नाश करणे शक्य आहे.

डोळ्याचे बिंदू थांबल्यास त्यांच्या मागेच वहाणाराश्वास थांबतो. श्वास थांबल्यास मनउर्ध्वमुख होवून थांबते. तेंव्हा बिंदुचा अनुभव होतो. ही सर्व साधने इष्टलिंगाद्वारेच शक्य असताना, त्याला सोडून करायच्या कोणत्याही साधनेला शरण मानत नाहीत.

गुरुनी दाखवलेले लिंग मनस्थल झाल्यावर
वारा भेदून समजेन म्हंटल्यास तोच द्रोह
इडा, पिंगळा सुशूम्ना नाक धरून समजेन म्हंटल्यास
कूडलसंगमदेव नाक कापणे सोडेल का ? --धर्मगुरुबसवेश्वर ७८८

पृथ्वी, आप, तेज, वायु आकाश निरंजन देवा,
तुमची महीमा प्रणव स्वरूपाशिवाय
बघणे कुणालाही शक्य नाही
ज्ञान ज्योत ध्यानाने नाडी शुद्ध द्वार होवून
पूजून पाहीलो मी कूडलसंगमदेवाला --धर्म गुरु बसवेश्वर ८१३

पश्चिम पद्मासनात पाठीचा कणा ताठ करून
ओठ आवळून डोळे उघडून(इष्टलिंग पहात)
भूवया उंचावून भुमध्याहून वारा आंगूले द्वारे
इष्टलिंग धरून, ब्रम्हरंध्रात बांधावे मंदिर कूडलसंगमदेवाला --धर्म गुरु बसवेश्वर ८१४

पद्मासनात बसून पूजा ध्यान केले पाहीजे. पाठीचा कणा ताठ करून ओठ न हलवता भूवया उंचावून लिंगत्राटक केले पाहीजे. ब्रम्हरंध्र किंवा त्रिकुटात असे मंदिर बांधताच, देव तिथे बंधिस्त होतो. किती सुंदर सुरमय वर्णन आहे. मानवाच्या देहात काही शक्ती केंद्र आहेत तीच चक्रे. शरीर विज्ञानानुसार पाठीच्या कण्यातून देहाच्या विविध अंगाला हे प्राणविद्युत वाहणारे साधन आहे. या योगशास्त्रात आधार, स्वामीछान. मीपूरक, अनाहत विर्शद्धी व आज्ञा अशी नाही आहेत. याशिवाय आणची तीन चक्रे योग शास्त्राज्ञी शोधले आहे ते म्हणजे, सहस्त्रात शिचा व पश्चिम चक्र, आधार चक्राचे स्थान, गुदस्थान, स्वधीस्ठानाचे स्थान, गुह्यस्थान मणिपूरक चक्राचे स्थान, नाभी अनाहुताचे स्थान, हृदयकमल विशुद्धीचे स्थान, कंठ आग्याचक्राचे स्थान भमध्य मसतकाचे आवरण हे सहव्रार चक्र आहे. डोळ्याच्या थोड्याशा मागे शिखा चक्र थेट मागे मानेच्या थोड्यावर पश्चिम चक्र आहे. स्वाभावीक मानवात भवजीवीत विषयासक्त होवून वहाणा-यांच्यात हि कुंडलिनी शक्ती किंवा जीव शक्ती मूलाधारात म्हणजे पाठीच्या कण्याच्या शेंड्यात दडून असते. ही सर्पशक्ती वेटोळे घालून आधार चक्रातील छिद्रात आपली फणा घुसवून लपलेली असते. घरातील पाण्याच्या सर्व चाव्या चालू ठेवून पाणी सोडल्यास ते गच्चीवरील टाकीपर्यंत पाणी पोचेल का.? तसेच कुंडलिनी शक्तीला वर वहाण्याची शक्ती नसून निशक्त स्थितीत असते. मुख्य कारण म्हणजे नऊ द्वारा द्वारें जीवशक्तीचा -हास होणे हे समजून घेऊन अध्यात्म पथिकानी नऊ द्वारा ला नियंत्रण करु लागतो. देहाच्या बरोबरच जन्मलेल्या पंचेद्रियांच्या चेष्टेमुळे कुंडलिनी ही निशक्त झाली आहे. म्हणून समजून साधक त्यांचे निर्दालन करतो. व पत्नी कुंडलिनीचे हात धरुन राजमार्गावरून (सुषुम्नाळ) आत्मशक्ती चालू लागते. मानवाच्या पाठीच्या कण्यात सुषुम्ना नावे सुक्ष्म नाळ वहाते. पाठीच्या कण्याच्या डाव्या व उजव्या बाजूला सुर्य नाळ व चंद्रनाळ असतात. मानवाच्या सहज स्थितीत ही प्राण वीज इडा पिंगळा द्वारे संचार करत असते. तिव्र साधनेने कुंडलिनी ढिली होवून तिची फणा सुषुम्ना नाळेद्वारे, वर चढू लागते. असे झोपलेल्या कुंडलिनीला वर चडवण्यासाठीच प्राणायाम, पवनभेदन इत्यादी म्हंटले गेले आहे. परंतू हे सर्व साधण्याची शक्ती इष्टलिंगात आहे. या इष्टलिंगावर दृष्टी ठेवलेल्याना भौतीक साधनेची गरज नाही.

लिंग त्राटक केल्याने, कुंडलिनी शक्ती वर मुख करून चालू लागते.

परस दार उघडून, मेलेल्याला उठवून,
जन्म दात्री मातेचे बोट धरल्यास, तीने आता
दिले आपले पदक --योगांग त्रिविधी

आधार चक्राला भेदून जीव शक्तीला उठवून कुंडलिनीचे बोट धरुन जात असता तीने दिव्यानुभवाचे पदक दिले.

नऊ द्वारांचे नियंत्रण सुषुम्न नाळेद्वारे
शक्तीला वर चढवल्यास कुंभात
असलेले अमृत मिळते.

इष्टलिंग त्राटक करत, करत, दृष्टी योगात मग्न झाल्यास सहस्त्रार चिदाकाशातील अमृत थेंबाथेंबाने गळते. ही कुंडलिनी नवचक्राला भेदून वर चढते तेंव्हा विविध तहेचे अनुभव येतात. अनाहत चक्राला स्पर्श झाल्यास नादानुभव आज्ञा चक्राला भेदल्यास बिंदूचा अनुभव सहस्त्रार प्रवेश केल्यास कळाचा अनुभव येतो.

ही कुंडलिनी शक्ती सहस्त्रार चक्रापर्यंत चढल्यास तिथे चित्कला प्राशन करते. त्यामुळे ती बलिष्ठ होते. त्याच्या परिणामाने कामाचा नाश करते त्यामुळे काम वृत्ती मिटते. सहस्त्रार पर्यंत कुंडलिनी चढताक्षणी दैवी प्रकाश सर्वांगात संचारतो त्या दिव्य प्रकाशात त्या शरणाच्या शरीर गुण, प्राणगुण, मन गुण, रुपी सर्व प्राणी नाश पावतात. तेंव्हा चिदाकाशाची पोकळी स्वत:च स्वत: होऊन शरण संचार करतो. तेंव्हा कुंडलिनी आणखी वर चढून पश्चिम चक्रात प्रवेश करते. कुंडलिनी सुर्याच्या किरण स्पर्शाने पश्चिम चक्राचे कमलदळ उमलून सुगंध देऊ लागते. तेव्हा सत् चित् स्वरुपाचा परमात्मारुपी भ्रमर येतो. त्याच्या परिणामाने सर्वांगात आनंदभाव समाविष्ठ होतो. असे नवचक्र भेदन व कुंडलिनी जागृती इष्टलिंग योगातून शक्य आहे.

Reference: "Ivalasa Jhala Paramatma" -A prose written by Maha Jagadguru Lingananda Swamiji & Maha Jagadguru Mate Mahadevi.
Published by Suyidhana Sugrantha Maale, Vishwakalyan Mission, Basava Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block Bangalore - 560 010
अनुवाद: शरण श्री गुलाब हसन नदाफ.

*
सूचीत परत
Previous इष्टलिंगाचे साकार रूप लिंगाग योगियांचे बहीरंग जीवन Next