Previous ‘लिंगायत धर्मात इष्टलिंगाचे स्थान’ *इष्टलिंग* जात्यातीत (जातिविहीन) चिन्ह Next

इष्टलिंग दिक्षा संस्कार इष्टलिंग दिक्षा व धार्मिक समानता

✍ पूज्य श्रीमन् निरंजन महा जगदगुरु लिंगानंद स्वामीजी
आणि महा जगद्गुरु डा. माते महादेवि

*

इष्टलिंग दिक्षा संस्कार इष्टलिंग दिक्षा व धार्मिक समानता

श्री गुरुलिंगदेवरू यांनी आपले हस्त माझ्या मस्तकावर ठेवल्याने माझा भवनाश झाला. मला आपलेस के ले. असे आक्कामहादेवीनी सांगितले आहे. ''मला आपलेसे केले', या शब्दात फार अर्थ भरलेला आहे. व धर्मीक समानता इथे दिसते गुरुनी शिष्याला अनुग्रह करुन आपलेसे करायचे ही धार्मीक समानता, ‘बसव धर्म', किंवा लिंगायत धर्माचे वैशिष्ठय आहे. गुरु 'पुरुष नव्हे' ज्योत स्वरुप आहे म्हणून शरणांनी घोषणा केली. यातूनच आपण इथे धर्मीक समानता पाहू शकतो. ‘परीस’ लोखंडाला सोने करतो. पण ‘परीस' करू शकत नाही. अर्थात आपलेसे करुन घेणार नाही. परीस व लोखंड यांच्या संबंधात समतेचे तत्व नाही परंतू, ‘ज्योत' आपल्यासारखे करून घेते. ‘तुमचा देहच ‘पणती भक्तीच तेल आचार हीच वात. गुरुची ज्ञानज्योत तुमच्या पणतीला स्पर्श केल्यावर तुमच्यातही ती ज्योत प्रज्वलीत होते. ती ज्योत आणि ही ज्योत एकाच प्रकारे प्रकाश देते. 'अहा !' कितीसुंदर उद्दात धार्मीक समतेची कल्पना याबाबत शरण श्री मग्येमायीदेवांनी म्हंटले आहे.

‘परीस' व गुरुपादकमळाला समान म्हंटल्यास नर्क चुकणार नाही. कारण ‘गुरुपाद कमळ' परीसासम नाही. कसे म्हणजे परीस लोखंडाला सोनं बनवू शकतो पण आपल्या परीस बनवू शकत नाही. याउलट 'गुरु' अनुग्रह करुन इतरांना गुरु बनवू शकतो.

धार्मीक समानता पटवून देणारे ‘जगदगुरु’ अल्लमप्रभू देवांचे एक वचन असे आहे की,

गुरुंचा मार्ग अद्भुत
भ्रमर कीटका समान आहे
गुरु ने मला ही गुरु बनवले आता शिष्य होवून
श्रीगुरुला पूजणार कोण ?
सांगा गुहेश्वरा
-- अल्लम प्रभू देव ७६३

गुरु शिष्याची तुलना मूंग किटकाशी कारणे फार अर्थपुर्ण आहे. भंग(गुरु) आपल्याला पाहीजे असलेल्या किटकाला आणून(शिष्याला आणून) आपल्या कोषात ठेवून आपल्या तोंडच्या रसाने दंश करून(अनुग्रह)बारा चवदा दिवसापर्यंत ठेवते. त्यानंतर त्या कोषातले हिरव्या रंगाचे किटक त्या शृंगाचे स्वरूप धारण करुन बाहेर पडते. तेंव्हा त्याला किटक म्हणून कुणीही ओळखत नाही त्याचपुमाणे शिष्य सुद्धा गुरुकृपेच्या प्रभावाने तद्रुप बनते.

बीजा पासून जन्मलेला वृक्ष बीजासारखाच असतो
मातेपासून जन्मलेली मुले मातेसारखीच असतात
धान्यापासून उगवलेले पीक धान्यासारखेच असते,
गुरुपासून जन्मलेला शिष्य गुरु रुपा व्यतिरीक्त नसतो अखंडेश्वरा --षण्मुख शिवयोगी वचन ४६

वडाच्या बीजापासून वडाचे झाड होते. लिंबाच्या बियापासून लिंबाचे झाड होते. आंब्याच्या बियापासून आंब्याचे झाड होते. जोंधळ्यापासून जोंधळ्याचे पीक गव्हापासून गव्हाचे पीक भातापासून भाताचे पीक येण्यासारखं आई बापासून जन्मलेली मुले आईबापासारखी तसेच गुरुंच्या करकमळात जन्मलेले शिष्य स्वाभावीकपणे आचार विचार
व अनुभव सर्वातच गुरु सारखेच असतात म्हणून या वचनात सांगितले आहे.

गुरु वचनाविणा भवपाश सुटणार नाही
गुरु वचनाविणा जातीभेद मिटणार नाही
गुरु वचनाविणा सूतक पातक जाणार नाही
गुरु वचनाविणा अंग मन प्राण शुद्ध होणार नाही
गुरु वचनाविणा लिंगाला कांती येणार नाही
गुरु वचनाविणा सद्भक्ती स्थीर होणार नाही
गुरु वचनाविणा खरी मुक्ती पावता येणार नाही
याकारणे गुरुस्पर्शाने गुरु झालेले परम शरणाना
शरणू शरण म्हणतो अखंडेश्वरा
--षण्मुख शिवयोगी वचन ३८

शिष्याने आपले भवपाश सूटण्यासाठी जाती भेद मिटण्यासाठी सुतक पातक जाण्यासाठी शरीर मन व प्राण शुद्ध होण्यासाठी लिंगात चित्कला भरवण्यासाठी सद्भक्ती स्थीर होण्यासाठी खरी मुक्ती पावण्यासाठी व स्वत:ला गुरुरुप होण्यासाठी त्या सदगुरुचे वचनामृत घेणे आवश्यक आहे. गुरु कृपा घेण्यासाठी इष्टलिंग दिक्षा संस्कार हे एक प्रमुख साधन आहे. म्हणून ष:प्रमुख स्वामी यानी सांगीतले आहे.

वेगवेगळी लाकडे आणून अग्नीत घातल्याने ते आपले पूर्णगुण सोडून जसे अग्नीस्वरूप होतात. तसेच वेगवेगळे जातीचे लोक सदगुरु कडून लिंगदिक्षा घेतल्यानंतर पूर्वाश्रय सोडून शरणस्वरूप बनतात.

लिंगादिक्षापसंपन्न झालेल्याना ते शुद्र’ ‘हे ब्राम्हण' म्हणून भेद करणारे नर्कात जातात. पाणी घट्ट होवून मोती बनते. पण तेच मोती पाणी होत नाही दुधावरच्या संस्काराने त्याचे तुपात रूपांतर होते पण तूप पुन्हा दूध होत नाही. त्याचप्रमाणे मानव कल्पीत कनिष्ठ जातीत जन्मलेली व्यक्ती गुरूकृपेने संस्कार घेतल्यास पुन्हा ती मानव होणार नाही. असे शरणांनी निक्षून सांगितले आहे.

दुर्बल मनाच्या मानवाला लिंगाचे महत्व काय ?

लिंगानुभवासाठी आसुसलेल्या मुमुक्षुभावनेने अंतकरण शुध्द करून घेतलेली सदाचारसंपन्न व्यक्ती कोणत्याही जातीची असो त्याला लिंगदिक्षा इतकेच नव्हे जंगमदिक्षयासुध्दा देता येते.म्हणून लिंगायत धर्मात म्हंटले गेले आहे. तरीसुध्दा तो योग्य असावा हे ही आपण विसरु नये.

भोपळ्याला लोखंडी कवच घातल्यास
तो न कुजता कठीण होईल का ?
दुष्टवृतीयाला दिक्षा दिल्यास
तो आपली वृती सोडेल का ?
कूडलसंगमदेव मनहिनाला
पक्वानाच्या रक्षणाला ठेवल्यासारखे -- धर्मपिता बसवेश्वर

भोपळा ज्यास्त दिवस टिकावा महणून लोखंडी कवचात ठेवल्यास तो न कुजता राहील का ? तसेच हीन मनाच्या विषयासक्त व्यक्तीला इष्टलिंगदिक्षा दिल्यास तो पूर्ववृती सोडणार नाही. दुर्विषयातच गुरफटणार लिंगभक्त होणार नाही. जिभेचे चोचले पुरवणा-याला पक्वान पदार्थाच्या रक्षणाला ठेवून चालणार नाही. तो ते खाऊनच टाकणार, विषयासक्त व्यक्ती सद्भक्त कधी होणार नाही.

शेणाच्या गणपतिला चाफ्याच्या फुलांनी पूजा केल्यास
शेणाचा वास पसरण्याचा राहील का ?
मातीच्या पुतळ्याला पाण्याने धुतल्यास
त्याचा चिखल व्हायचा थांबेल का --धर्मपिता बसवेश्वर

शेणाची एक गणपतीची मूर्ती करून त्याला चाफ्याच्या फुलाने पुजा केल्यास डोळ्याला चांगले दिसले तरी त्याच्या जवळ गेल्यास दुर्गंदी आल्याविणा रहाणार नाही. चिखलाची बाहूली करुन तिला रोज पाण्याने धुतल्यास ते चिखलच होईल. तसेच प्रापंचीक आसक्त मानवाला लिंगदिक्षा दिल्यास तो खरा भक्त कधीही होणार नाही. म्हणून सुंदर उपमेतून गुरु बसवेश्वरानी सांगितले आहे.

Reference: "Ivalasa Jhala Paramatma" -A prose written by Maha Jagadguru Lingananda Swamiji & Maha Jagadguru Mate Mahadevi.
Published by Suyidhana Sugrantha Maale, Vishwakalyan Mission, Basava Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block Bangalore - 560 010
अनुवाद: शरण श्री गुलाब हसन नदाफ.

*
सूचीत परत
Previous ‘लिंगायत धर्मात इष्टलिंगाचे स्थान’ *इष्टलिंग* जात्यातीत (जातिविहीन) चिन्ह Next
cheap jordans|wholesale air max|wholesale jordans|wholesale jewelry|wholesale jerseys