शरण मेळावा- बसव क्रांती दिन | लिंगायत धर्मगुरु गुरु बसव |
लिंगायत धर्म मध्ये आपले स्वागत आहे.
लिंगायत धर्म: समता, बंधुभाव, नैतिक, समृद्धी आणि प्रगतीचे प्रतीक! अनंतकाळचे जीवन शांतीचा मार्ग.!
जगव्यापी, आकाशभर, त्यापलीकडे विस्तार तुमचा हो,
पाताळापलीकडे तुमचे चरणकमल,
ब्रह्मांडापलीकडे तुमचे किरीट.
अगम्य, अगोचर, अप्रतिम लिंगय्या, कुडलसंगमदेवा,
माझ्या करस्थळी येऊन इवलेसे झाला की हो. - धर्मगुरु बसवण्ण /201 [1]
लिंगायत हा एक धर्म असून ती जात नव्हे. जन्मामुळे मानवांना उच्च नीच असा विभाग करते ती जात. जनमल्यापासून सर्व समान आहोत अशी घोषणा करून कोणतीही जात, वर्ग, वर्णभेद न मानता जातीरहित धर्माचा आसक्ती असणात्या सर्वाना दीक्षा संस्कार मिळविता येतो असे सांगणारा तो धर्म. या धार्मिक संस्कारामुळे व्यक्तिने मिळविलेली योग्यता, पात्रता, यामुळे तो श्रेष्ट अगर कनिष्ट मानला जातो असे सांगतो तो धर्म. लिंगायत धर्मात जन्मामुळे कोणीही उच्च, नीच असे न मानता ’विटाळाविण पिंडास न च आश्रय’ असे सांगून असा बोध दिला आहे.
गोत्रनाम पुसता गप्प का बसता?
शिर खाजवित भूमी का गिरवता?
गोत्र मादार चेन्नय्या, गोत्र डोहार कक्कय्या,
ऐसे सांगा ना हो, कूडलसंगय्या
जिकडे पहावे तिकडे तूचि देवा,
संपूर्ण विस्तृत असे रूप तुझेच देवा.
‘विश्वतश्चक्षु' तूचि देवा,
‘विश्वतोमुख' तूचि देवा,
‘विश्वतोबाहू' तूचि देवा,
‘विश्वत:पाद' तूचि देवा,
कुडलसंगमदेवा. /85 [1]
न जाणणात्या मानवाला जाणता शरण बनण्यास हवा असलेला दीक्षा संस्कार व पूजा स्वातंत्र्य सर्वाना समानतेने देतो म्हणून तो धर्म आहे.
[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.
धर्मगुरु: | विश्वगुरु बसवण्ण (११३४-११९६) |
धर्म संहिता (धर्मग्रंथ): | वचन साहित्य |
धर्म भाषा: | कन्नड |
धर्माचे देव नाव: | लिंगदेव |
धर्म चिन्ह: | जगव्यापी, जगन्नियंताचा प्रतीक ’इष्टलिंग’ |
धर्म संस्कार: | लिंगधारण/ इष्टलिंग दीक्षे |
धर्म सिद्धांत: | शून्य सिद्धांत |
साधना: | त्राटक योग (लिंगांगयोग) |
दर्शन: | षटस्थल दर्शन |
समाजशास्त्र: | शिवाचार-(सामाजिक समानना) |
नीति शास्त्र: | गणाचार (धर्म सरंक्षककर्ता) / भृत्याचार (स्वयंसेवक, करसेवक) |
अर्थ शास्त्र: | सदाचार (कायक- दासोह-प्रसाद) |
संस्कृति: | अवैदिक शरण संस्कृति |
परंपरा: | धर्मपित बसवेश्वरानिच आदि पुरुष हेऊन तेव्हापासून आतापर्यत अव्याहत सतत वाहत असलेली शरण परंपरा (Heritage). |
धर्म क्षेत्र: | गुरु बसवण्णांचे ऐक्यक्षेत्र कूडलसंगम, शरणभूमि बसवकल्याण |
धर्म ध्वज: | षट्कोन - इष्टलिंग सहित केशर रंगवणे बसव ध्वज |
धर्माचे ध्येय: | जाति, वर्ण, वर्ग रहित धर्मासोबत शरण समाज निर्माण (कल्याण राज्य निर्माण) |
शरण मेळावा- बसव क्रांती दिन | लिंगायत धर्मगुरु गुरु बसव |